Thursday, May 17, 2018

नवउद्योजकांचा आधारस्तंभ – देआसरा



जीवनात यश त्यानांच मिळते जे चिकाटीने कार्यरत असतात. आपल्यात असलेले कौशल्य जाणून सातत्याने जो वाटचाल करतो त्यालाच यश मिळते. दत्तात्रय व स्नेहल बागडे हे याचे एक उत्तम उदाहरण. या जोडलंप्याला जेव्हा त्यांच्या पहिला बाळाची गोड बातमी कळली तेव्हा एक आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळले. आपल्यात असलेले कौशल्य जाणून गृहिणी असलेल्या स्नेहल यांनी पतीला हातभार लावण्यास सुरवात केली. व त्यातूनच एक नवीन उद्योजिका जन्माला आली. पती पत्नी दोघांनी मित्राच्या पेंटिंग व्यवसायात सामील होऊन सुशोभित वस्तू तयार करण्यास सुरवात केली. काही काळानंतर त्यांना अधिक भांडवलाची गरज भासू लागली. त्यावेळी त्यांनी देआसराकडे धाव घेतली. आज ते एक यशस्वीरित्या आपला व्यवसाय करत आहेत.

मार्केटिंग व कस्टम रिलेशन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या आदित्य काळेने स्वतःचे स्नॅक्स सेंटर सुरु करायचे ठरवले. व्यवसाय चालवण्यासाठी लागणाऱ्या कर्जाचे योग्य नियोजन न केल्याने आदित्य कर्जाची वेळेवर फेड करू शकत नव्हता. आदित्यची ही परिस्थिती समजून घेऊन देआसराने त्याचा योग्य रित्या व्यवसायाचा आराखडा व बँकेचे कागदपत्रे बनवले. आता आदित्य यशस्वीपणे वायसाय करत आहे व कर्जाची परतफेड योग्य वेळेस चालू आहे.

वाणिज्य शाखेत शिक्षान घेतलेल्या चैत्राली यांनी लग्नानंतर घरूनच ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला व त्याच बरोबर घरून डबे देण्याचे कामही सुरु केलेलं. थोड्यच दिवसात त्यांनी स्वतःची फूड व्हॅन सुरु केली. त्यासाठी लागणाऱ्या सर्व योजनेसाठी देआसराने त्यांना मार्गदर्शन दिले.             

अशा अनेक नव उद्योजकांना व्यवसाय उभा करण्यासाठी व तो वाढवण्यासाठी देआसरा फाउंडेशन मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन रोजगार वाढवण्याच्या हेतूने डॉ. आनंद देशपांडे यांनी देआसरा फाउंडेशनची स्थापना केली आहे. नव्याने उद्योग चालू करणाऱ्या उद्योजकांसाठी देआसरा ही खऱ्या अर्थाने आसरा देणारी संस्था झाली आहे. या फाउंडेशनचे ध्येय २०२० पर्यंत कमीतकमी एक लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने  25,000  उद्योगांना त्यांचे व्यवसाय सुरू करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि वाढविण्यासाठी सक्षम करणे, असे ध्येय समोर ठेवले आहे. प्रज्ञा गोडबोले या फाउंडेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी असून देआसराच्या कार्यकारी टीममध्ये पूर्वी नामांकित बँकिंग आणि सरकारी वित्तीय संस्थांमध्ये काम करून समृद्ध अनुभव असलेले लोक कार्यरत आहेत.

ना नफा ना तोटा या तत्वावर या संस्थेचे कामकाज चालू असून उद्योजकांना एक समर्पित व्यवसाय सुविधा उपलब्ध करून देते ज्याला उद्योगमित्र म्हणले जाते. जो व्यवसायासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करतो आणि निरंतर यशस्वीतेची खात्री देतो. देआसरा व्यवसाय व मालकांसाठी एक सक्षम व्यासपीठ तयार करून देते यातून ते व्यवसायाची ओळख, त्यातील चढ उतार, व्यवसायाला असलेली बाजारपेठ याची सर्व माहिती नव उद्योजकाला देण्यात येते. व्यवसाय सुरु झाल्यावर देखील उद्योगमित्र हा नवउद्योजकाबरोबर असतो. व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला देअसरा कायम उद्योजकाच्या पाठीशी ठाम पणे उभे असते. नव्याने व्यवसाय करणे हे अगदी ध्येर्याचे काम आहे. व्यवसायात आपण यशस्वी होऊ का? हा व्यवसाय आपल्याला योग्यरीत्या चालवता येईल का? असे अनेक प्रश्न नवीन व्यवसाय चालू करताना प्रत्येकाच्या मनात येतात. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याआधी उद्योजकांना व्यवसायासंबंधी विविध प्रकारची मदत व माहिती दिली जाते.

उद्योजकता वाढवणे, उद्योजकांना व्यवसाय चालवणे सोपे करणे हे ध्येय ठेऊनच देअसरा कार्यरत आहे. बेरोजगारीची मोठी समस्या सोडवण्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक घडवायला हवेत, या उद्येशाने फाउंडेशनची निर्मिती झाली. सहजपणे ग्राहकांशी जोडण्यासाठी, त्यांचे उत्पादन / सेवा बाजारात आणणे, व्यवहार करणे आणि दैनंदिन व्यवसाय कार्यप्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.


No comments:

Post a Comment

Bright Future partners with Cognizant Foundation’sTech4All program to ensure sustainable livelihoods for young women of marginalized communities in Pune

·        215 female aspirants registered in the first batch. ·        This is the 15 th operational center of Bright Future I Pune with p...